आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आईच्या वर्षश्राद्धाच्या स्मरणार्थ वृक्षारोपण, प्रवचन

Spread the love

भूम : भूम येथील महादेव मनगिरे यांनी त्यांच्या आईच्या वर्षश्राद्धाच्या स्मरणार्थ विविध उपक्रमाचे आयोजन केले होते.

महादेव मनगिरे यांनी जहागीर मठ नागनाथ देवस्थान भूम येथील मंदिरामध्ये कंपाउंड वॉल बांधून दिले तसेच स्वच्छता करून तेथे वीरुपक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज यांच्या हस्ते बेलाचे झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दत्त मंदिरात गुरुपक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज यांचे प्रवचनही ठेवण्यात आले होते.

यावेळी नगराध्यक्ष संजय गाढवे, बाळासाहेब गवळी, डॉ खोले, सिद्धेश्वर मनगिरे, अशोक तोडकर, शशिकांत बिरबळे, धनंजय शेटे, मधुकर शेटे, ओम स्वामी, प्रकाश शास्त्री, महादेव मनगिरे महेश मनगिरे उमेश मनगिरे, विजय सोलापूरे, बालाजी माळी, सुनीलकुमार डुंगरवाल, महेश तांबोळकर व अन्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

get_footer();