आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आचार्य महाश्रमणजी यांचा पुणे दौरा

Spread the love

पुणे : युगप्रधान जैन तेरापंथ धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य महाश्रमणजी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त त्यांना अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा शुक्रवारी (दि. २९) सकाळी साडेआठ वाजता शिवाजी नगर शिमला ऑफिस पासून सुरू होणार आहे. या दौऱ्यादरम्यान ‘ड्रग्ज फ्री पुणे’ आणि ‘डिजिटल डिटॉक्स’ मोहिमेविषयी आचार्य महाश्रमणजी मार्गदर्शन करणार आहेत.

आचार्य महाश्रमणजी यांनी ‘ड्रग्ज मुक्त भारत’ हे अभियान सुरू केले आहे. ड्रग्ज आणि डिजिटल माध्यमांनी आजच्या तरुण पिढीला विळखा घातला. त्यातून त्यांची सुटकेसाठी महातपस्वी आचार्य महाश्रमणजी संपूर्ण भारतात हजारो मैलांची पदयात्रा करीत आहेत शिवाजी नगर-शनिवार वाडा-रास्ता पेठ महावितरण कार्यालयामार्गे गंगाधाम चौकमार्गे बिबवेवाडी येथे जाणार आहे. गंगाधाम चौकातील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात य अभिवादन यात्रेचा समारोप होईल.

get_footer();