आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आठवडी बाजारातील शौचालय तत्काळ खुले करा

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Social • February 16, 2024
Spread the love

सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचा इशारा

भूम : आठवडी बाजारातील शौचालय तात्काळ खुले करा अन्यथा कुलपे काढून नागरिकांना खुले करुन देणार असा इशारा सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी दिला आहे.

शहरातील आठवडी बाजारात कल्याण नगर, लोक शाहीर अण्णाभाऊ साठे नगर, वडार गल्ली, बागवान गल्ली, शेंडगे गल्ली, शेळके गल्ली, भीम नगर मधील रहिवाशांसाठी नगरपरिषदेमार्फत दोन नवीन शौचालय बांधण्यात आलेले आहेत पण अद्याप हे शौचालय गेल्या दोन-तीन वर्षापासून बांधून पूर्ण असताना या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना उघड्यावर आठवडी बाजारात शौचालयास जावे लागते.

तसेच महिलांनाही उघड्यावर शौचालयास बसावे लागत आहे. या परिसरात राहणारे बहुतांश मागासवर्गीय नागरिक असून नगरपरिषदेकडून जाणून-बुजून जातीय द्वेष मनात बाळगून या मागासवर्गीय समाजाला त्रास देण्याच्या उद्देशाने या शौचालयाला कुलपे लावून ठेवण्यात आलेली आहेत.

असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. येथील नागरिकांना दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्यांना आठवडी बाजारात शौचालयात जावे लागते त्यामुळे आठवडी बाजारात पूर्ण हागणदारी झालेली आहे.

याचा प्रत्यय नगरपरिषद मुख्याधिकारी यांना आलेला आहे. त्यांनी या आठवडी बाजारात अग्निशामक दलाची गाडी आणून तो बाजार पाण्याने धुऊन काढला होता आणि याच बाजारात दर गुरुवारी भूम तालुक्यातील शेतकरी आपला भाजीपाला विकण्यासाठी येत असतात.

अशा परिस्थितीत सर्व भाजीपाला व इतर वस्तू विकल्या जात असल्यामुळे नागरिकांनाही ते घेणे आता अपरिहार्य झालेले आहे.अशा घाणीतील भाजीपाला नेल्यामुळे भूम शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.

याबाबतीत आम्ही मुख्याधिकारी यांना भेटून या सर्व गोष्टीची कल्पना दिलेली असतानाही मुख्याधिकारी अजूनही हे दोन्ही शौचालय उघडायला तयार नाहीत.

त्यामुळे गुरुवार दि. 22/02/2024 पर्यंत आठवडी बाजारातील दोन्ही शौचालय खुले न केल्यास या सर्व भागात राहणाऱ्या रहिवासी व महिलांना व घेऊन आठवडी बाजारातील शौचालायची कुलपे तोडून नागरीकांसाठी खुले केली जातील, असा इशारा काँग्रेस तालुका अध्यक्ष रुपेश आप्पा शेंडगे, आबासाहेब मस्कर, भाजप तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, चंद्रमणी गायकवाड, प्रदीप साठे, सचिन बारगजे आदी पदाधिकारी यांनी दिला आहे. मुख्याधिकारी यांना या संदर्भांत निवेदन दिले आहे.

get_footer();