आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा

Spread the love

तहसिलदार जयवंत पाटील यांचे आवाहन

भूम : विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सर्व लाभार्थीनी दिनांक ३१ मार्च २०२४ पर्यंत आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने सर्व लाभार्थीनी आधार कार्ड व बँक खाते लिंक करून केवायसी करून घ्यावे.

सदर कार्यवाही ३१ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण न केल्यास एक एप्रिल २०२४ पासून मिळणारे अनुदान बंद करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी असे आवाहान तहसिलदार जयवंत पाटील यांनी केले आहे.

get_footer();