आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आनंद चोरडिया यांना “विरासत सन्मान” पुरस्काराने गौरव

Spread the love

पुणे : पर्यावरणपूरक नवकल्पनांसाठी सातत्याने कार्य करणारे सुहाना स्पायसेसचे संचालक – तंत्रज्ञान व नवोन्मेष, तसेच द इको फॅक्टरी फाउंडेशन (TEFF) चे संस्थापक आनंद चोरडिया यांना “विरासत सन्मान” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

आनंद चोरडिया यांची दूरदृष्टी, नेतृत्वदायी क्षमता आणि नवोन्मेषाबद्दलची निष्ठा यामुळे सुहाना प्रवीण मसालेवाले या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे क्षितिज गाठले आहे. टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन डायरेक्टर या नात्याने त्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक बाजारपेठेतही ब्रँडची ठसा उमटवणारी ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीने गुणवत्ता, परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर समन्वय साधत सातत्यपूर्ण प्रगती केली आहे. शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि ‘नेट झिरो’ प्राप्त करण्याच्या दिशेने त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

हा पुरस्कार समारंभ वनकांती फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आला होता. कौस्तुभकुमार गुजर व उदयकुमार गुजर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे आणि त्यांच्या कार्याचे वारशाप्रमाणे जतन करणे हा आहे.

TEFF या संस्थेमार्फत आनंद चोरडिया यांनी उभारलेले कार्य म्हणजे पर्यावरण संवर्धन, नवोन्मेष आणि शाश्वत जीवनशैलीकडे जाणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.

get_footer();