आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १७ लाखाला गंडा

Spread the love

पुणे : विविध बँकेच्या खातेदारांना आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १७ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार मार्केट यार्ड परिसरात घडला आहे. ३१ मे ते २५ जून या काळात ही घटना घडली आहे.

मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार संबधित खातेदारांना ऑनलाईन माध्यमाव्दारे व विविध बँक खातेधारक यांना ब्लॉक ट्रेडींग व आयपीओ मध्ये गुंतवणुक केल्यास जास्त परतावा मिळेल असे अमिष दाखवुन त्यांचा विश्वास संपादन केला.

त्याला भुलून फिर्यादी यांनी गुंतवणूक केली मात्र नफा मिळाला नाही. फिर्यादी यांची १७,२५,०००/- रु.ची आर्थिक फसवणुक झाली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे करीत आहेत.

get_footer();