आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आयपीओ मिळवुन देण्याचे प्रलोभन दाखवुन फसवले

Spread the love

पुणे : आयपीओ मिळवुन देण्याचे प्रलोभन दाखवुन तरुणाची २१ लाख रुपयांची फसवणूक फसवले केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली आहे.

विमानतळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अनोळखी तरुणाने ऑनलाईन माध्यमाव्दारे फिर्यादी यांना त्यांचे फेसबुक अकाउंटवर जाहिरात मधील स्टॉक तसेच आयपीओ तपशिल ॲप्लीकेशनद्वारे आयपीओ मिळवुन देतो असे प्रलोभन दाखवुन विश्वास संपादन केला.

एका व्हॉटसअप ग्रुपला जॉईन करून गुतंवणुकीसाठी विचारणा करून एका लिंक अॅप वरून वेगवेगळ्या बँक खात्यामधे २१,०५,०००/- रू भरावयास लावुन काही एक नफा न देता फसवणुक केली आहे. या नागरिकाने पोलिसात फसवणुकीची तक्रार दिली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सर्जेराव कुंभार करीत आहेत.

get_footer();