आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आय टी एस परीक्षेत गुरुदेव दत्त प्राथमिक विद्या मंदिरचे घवघवीत यश

Spread the love

भूम : श्री गुरुदेव दत्त प्राथमिक विद्या मंदिर ने आय टी एस २०२४ मध्ये उज्वल यशाची परंपरा कायम राखली. गुरुदेव दत्त प्राथमिक विद्या मंदिर भूम या नामांकित शाळेच्या विद्यार्थ्यांनी आय टी एस २०२४ या परिक्षेत केंद्र ते राज्य अश्या विविध स्तरावर घवघवीत यश संपादन केले आहे.

शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आयटीएस परिक्षेत राज्यस्तरीय परीक्षेस समृद्धी स्वामी (इ. ३री २७८/३०० गुण) राज्यात दहावी आली. जिल्हास्तरीय परीक्षेत (इयत्ता १ ली) संभाजी बाराते चौथा, प्रिया मारकड पाचवी, भूमी अंधारे सहावी, ज्योती खारगे सातवी, शिवम डमरे आठवा, संस्कार चव्हाण नववा, स्वराज गवळी दहावा आला आहे.

केंद्रातील परीक्षेत विद्यार्थी (इयत्ता १ ली) अथर्व डांगे पहिला, सौरभ शिर्क चौथा, अक्षय बागडे चौथा, रोहिणी चौधरी चौथी आली. जिल्हास्तरीय परीक्षेस यशस्वी विद्यार्थी (इयत्ता २ री) शांभवी सोलापूरे सहावी, क्रांती शाहीर सहावी. अरिशा शेख आठवी आली आहे.

केंद्रस्तरीय परीक्षेत यशस्वी विद्यार्थी (इयत्ता २ री) ओवी सोन्ने दुसरी, पियुष डोंबाळे तिसरा, सर्वेश फलके तिसरा, स्वराज्य लांडगे तिसरा, आर्यन खांडेकर तिसरा, अर्णवी गाढवे पाचवी आली. जिह्यास्तरीय परीक्षेस यशस्वी विद्यार्थी (इयत्ता ३ री) सुप्रिता माळी आठवी, श्रेया गिलबिले नववी, प्राची बोरकर दुसरी जिह्यास्तरीय परीक्षेत यशस्वी विद्यार्थी (इयत्ता ४ थी) समृद्धी राऊत दुसरी, अजिता चांडगे चौथी, श्रद्धा घोडके पाचवी, संयोगिता खराडे नववी आली.

केंद्रस्तरीय परीक्षेस यशस्वी विद्यार्थी (इयत्ता ४ थी) राहत पठाण पहिला, तन्वी ढगे दुसरी, दाक्षायानी कालवटकर तिसरी, रुद्र शिंदे तिसरा, श्रुती कातखडे पाचवी, प्रथमेश कात्रजकर पाचवा आला. यशस्वी विद्यार्थ्यासाठी वंदना घाडगे, माधवी साठे, राजेश भोरे, राखी दुरुगकर, भूपालसिंह गायकवाड. सतिश मुळे, आशा वाळके, सुनिता खोसे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांच्या संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव मोटे, उपाध्यक्ष विजय मोट, सचिव सतिश देशमुख मुख्याध्यापक सतीश भालेराव, श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूम मुख्याध्यापिका अंजना मुंढे, शालेय व्यावस्थापन समिती उपाध्यक्ष प्रल्हाद आडागळे, ॲड अमरसिंह ढगे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भूपालसिंह गायकवाड यांनी केले आहे.

get_footer();