आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आरोग्यदूत राहुल घुले यांच्या हस्ते क्रिकेट चषकाचे उद्‌घाटन

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • January 23, 2024
Spread the love

भूम : वर्गमित्र कै. अविनाश मोटे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी डॉक्टर राहल घुले यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात आज शहरातील तालुका क्रीडा संकुल येथे शहरातील व तालुक्यातील माजी क्रिकेट खेळाडू यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‌घाटन करण्यात आली.

या स्पर्धा बाद पद्धतीने खेळवण्यात येणार असून या स्पर्धेत मुंबई, पुणे, सोलापूर, बार्शी, बीड यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून २५ क्रिकेट संघानी सहभाग नोंदवला आहे. महत्वाची बाब म्हणजे सदरील स्पर्धेत तिन्ही बक्षिसे डॉ. राहुल घुले यांनी दिली असून पहिले पारितोषिक १ लाख ५१ हजार, दुसरे १ लाख व तिसरे ५० हजार बक्षीस विजेत्या संघास देण्यात येणार आहेत.
सामने उत्तम दर्जाचे व्हावेत म्हणून पंच देखील असोशियेशनचे मागवण्यात आले असून याचे थेट प्रक्षेपण देखील दाखवण्यात येणार आहे.
यावेळी डॉ. राहुल घुले, तहसीलदार सचिन खाडे, संजय स्वामी, रुपेश शेंडगे, सूर्यकांत गाढवे, राजेंद्र गाढवे, किरण कुलकर्णी, पिणू टकले, बिभीषण जाधव, राजेंद्र शाळू, शमीम शिकलकर, बबलू मोमीन, आमोल तेलंग, प्रल्हाद अडागळे, दादा आकरे, शाम होळकर, चंद्रमणी गायकवाड, असिफ जमादार, मयूर शाळू, अमर जमादार, संदीप मोटे, अमोल जाधव, माऊली बाराते यांच्या सह क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्र संचालन अलीम शेखसर यांनी केले.

get_footer();