आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love

भूम: राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गुरुवारी (दि. २४) सकाळी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर येथे दर्शन घेऊन विधानसभेचा उमेदवारी अर्ज भूम येथील तहसील कार्यालयात दाखल केला. यावेळी महायुतीतील भाजप, अजित पवार गट घटक पक्षातील नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गाजावाजा न करता मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी धनंजय सावंत, केशव सावंत, गिरीराज सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालूक्य, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, बाळासाहेब पाटील हाडोग्रीकर, संजय नाना गाढवे, बाळासाहेब शिरसागर, नवनाथ जगताप, अण्णासाहेब देशमुख, विभीषण खामकर, शिवाजी अण्णा भोईटे, महादेव अंधारे, सुभाष मोरे, विशाल ढगे, प्रवीण देशमुख, समाधान सातव, निलेश चव्हाण, युवराज हुंबे, दत्ता अण्णा साळुंके, गौतम लटके, संदीप खरसडे, रामकिसन गव्हाणे, वैजनाथ मह्माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

“विकासाचे पर्व गेल्या ३० ते ४० वर्षांत या धाराशिव जिल्ह्याने कधी पाहिलेच नाही, ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मी केलेल्या कामाची पोचपावती २० नोव्हेंबरला मतपेटीत दिसेल,” असे सावंत म्हणाले.

get_footer();