आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आरोग्यमित्र परिवार संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • February 5, 2024
Spread the love

डॉ. राहुल घुले यांच्या हस्ते होणार उद्‌घाटन

पुणे : डॉ. राहुल घुले यांच्या हस्ते आरोग्यमित्र परिवार संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात येणार आहे. हे उदघाटन ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २:३० वाजता राजधानी फंक्शन हॉल, एस. टी. डेपो शेजारी, बावची रोड, परांडा जि. धाराशिव उस्मानाबाद येथे होणार आहे.

कमल घुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून डॉ. राहुल घुले यांच्या वतीने आजतागायत भूम, परांडा, वाशी तालुक्यातील 200 रुग्णांचे मोफत ऑपरेशन तसेच शेतकऱ्यांच्या बांधावरून जळालेल्या 100 डी.पी.ची मोफत वाहतूक व 500 तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे कार्य यापुढेही अविरतपणे सुरु राहील.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोफत ऑपरेशन व इतर आरोग्य सेवा, शेतातील डी.पी.ची मोफत वाहतूक सेवा, हजारो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन राहुल घुले आरोग्यमित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

get_footer();