आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

Spread the love

भूम : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला असून त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी जनता एकजूट झाली असल्याने धाराशिव जिल्ह्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांचे साधे आणि सरळ नेतृत्व मानून जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे.

मंत्री तानाजी सावंत हे शिवसेनेच्या नेत्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरत आहेत. भूम येथे मुख्य गोलाई चौकामध्ये शिवसेनेने आदोलन केले. शिवसेना पक्षाला सहनभूती मिळत असुन उद्धव ठाकरे यांच्या सभेला सर्वसामान्य जनता पाठीशी उभी राहत आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या घरी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे भेटण्यासाठी गेले होते.

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्या मुळे सर्व सामान्य नागरिक त्यांच्या पाठीशी उभा राहीला आहे. या आंदोलनाच्या वेळी भूम तालुका प्रमुख एडवोकेट श्रीनिवास जाधवर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख जिनत सय्यद, उपजिल्हाप्रमुख डॉक्टर चेतन बोराडे, विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, विधानसभा समन्वयक दिलिप शाळू, युवा सेना तालुकाप्रमुख सुधीर ढगे, महिला आघाडी तालुकाप्रमुख उमा रणदिवे, ताई लांडे, उपतालुका प्रमुख आनंद नलावडे, उपतालुका प्रमूख रामभाऊ नाईकवाडी, दिपक मुळे, माजी शहरप्रमुख अशोक वनवे, श्रीमंत भडके, विहंग कदम, ॲड विनायक नाईकवाडी, अनिल शेंडगे, मनोज पेंटर, युवासेना संघटक अजित तांबे, सुवर्णा लोंढे, वंदना आडागळे, विकास चव्हाण, शंकर गपाट, संग्राम लोखंडे यांच्या सह शिवसैनिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

get_footer();