आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आर्थिक फायद्याच्या आमिषाने ४० लाखाची फसवणूक

Spread the love

पुणे : ऑनलाईन माध्यमाव्दारे ट्रेडींगचे खाते तयार करून अधिक फायदा मिळवुन देण्याचे आमिष दाखवून ४० लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार हडपसरच्या भेकराईनगर परिसरात घडला आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना मोबाईलवर अनोळखी तरुणाने संपर्क साधला. त्यांना व्हॉटसअप ग्रुप मध्ये अॅड करून फिर्यादीचे ट्रेडींगचे खाते तयार करून अधिक फायदा मिळवुन देण्याचे आमीष दाखवुन पैसे भरायला लावले.

फिर्यादिने परतावा मिळण्याची वाट पाहिली. परंतु कोणाताही परतावा मिळाला नाही. त्यामुळे फिर्यादीने ३९,६०,०००/-रू. ची आर्थिक फसवणुक झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोढवे करीत आहेत.

get_footer();