आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आळंदी जैन स्थानकात नेत्र शिबीर व चष्मे वाटप

Spread the love

आळंदी : आळंदी येथे महर्षी आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठान, श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ आणि महर्षी आनंद युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र चिकित्सा शिबिर व चष्मे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि.२७ ऑक्टोबर) रोजी करण्यात आले होते.

प. पु. वाणीभूषण प्रशांतऋषीजी म. सा. तसेच मधुरकंठी, मधुरवक्ता प. पु. विजयस्मिताजी म. सा. यांच्या प्रेरणेने आळंदी जैन स्थानक येथे हे शिबिर पार पडले. शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास २५० लोकांनी डोळे तपासनीचा लाभ घेतला.

डॉ. ललित शहा तसेच ताराचंद हॉस्पिटल पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले, अशी माहिती श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांनी दिली. कार्यक्रमास डॉ. अशोककुमार पगारिया तसेच महर्षी आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आळंदीचे माजी नगरसेवक मदनशेठ बोरुंदिया, अविनाश बोरुंदिया, सचिन बोरुंदिया, नंदकुमार वडगावकर, परेश चोरडिया, प्रमोद बाफना, राजेंद्र बाफना, अभिनंदन चोपडा, राजेंद्र धोका, किरण लोढा तसेच आळंदी महिला मंडळ उपस्थित होते. शिबिर झाल्यानंतर आळंदी जैन स्थानकातर्फे सर्वांनी गौतम प्रसादीचा लाभ घेतला.

get_footer();