आवृत्ती पुणे
← Back to Homepage

उच्च शिक्षित असून केवळ व्यसनासाठी चोरायचा दुचाकी

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, People, Police • February 16, 2024
Spread the love

३ दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला सहकारनगर पोलिसांनी केली अटक

पुणे : इंटिरीअर डिझायनींगचा डिप्लोमा करुन उच्च शिक्षीत असतानाही केवळ व्यसनाच्या आधीन गेल्याने दुचाकी वाहने चोरण्याची सवय लागलेल्या युवकास पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून १,९५,०००/- किंमतीच्या ३ दुचाकी जप्त करून वाहन चोरीचे ३ गुन्हे उघड झाले आहेत. या प्रकरणी प्रशांत प्रभाकर कान्हेकर (वय ४७ वर्षे रा.स.नं.५०३, प्लॉट नं.१६, साहील सोसायटी फ्लॅट नं.१, महाविर फर्निचर दुकानाजवळ बिबवेवाडी पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार असे वाहन चोरी, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व विशाल वाघ यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की एक इसम चोरीची काळया रंगाची अॅक्टीव्हा गाडी हिच्यासह सावरकर चौक धनकवडी पुणे येथे थांबला आहे.

त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवून त्यांचे परवानगीने सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाकडील स्टाफसह हि व्यक्ती गाडीवरून सावरकर चौकातुन पुढे जात असताना दिसली.

लागलीच त्यास स्टाफच्या मदतीने थोडयाच अंतरावर ताब्यात घेतले. त्याच्याकडील गाडी त्याने डी मार्ट पुणे सातारा रोड पुणे याठिकाणा वरून दि.०८/०२/२०२४ रोजी चोरल्याचे कबुल केले.

सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी दोन वाहने चोरल्याचे सांगितले.

असे ३ वाहनचोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. या आरोपीवर चोरीचा एक गुन्हा विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे दाखल आहे. हि कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२. स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी, सहकारनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाले यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा.

पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, विशाल वाध, बजरंग पवार, निलेश शिवतारे, सागर सुतकर, सागर कुंभार, नवनाथ शिंदे यांनी केली आहे.

get_footer();