आवृत्ती पुणे
← Back to Homepage

उधारीवर सिगारेट न दिल्याने शस्राने केले वार

Spread the love

दोन सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल

पुणे : उधारीवर सिगारेट न दिल्याने टपरी चालकावर धारधार शस्राने वार करुन परिसरात दहशत पसरविण्याचा प्रकार जुना मुंढवा रोडवर घडला. याप्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत राजेश ब्रिजलाल जैस्वाल (वय-35 रा. झेड कॉर्नर मांजरी, पुणे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन शाहीद कलीम शेख, राजु मच्छिंद्र शिंदे (दोघे रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शाहीद शेख हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

त्याच्यावर स्वारगेट, वानवडी, चंदननगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश जैस्वाल यांचे जुना मुंढवा रोडवरील रिलॅक्स हॉटेल जवळ पूजा पान शॉप आहे.
रविवारी सायंकाळी संशयित आरोपी दारु पिऊन त्याठिकाणी आले. त्यांनी उधारीवर सिगारेट मागितली. उधारीवर सिगरेट दिली नाही म्हणून राग आल्याने आरोपींनी जैस्वाल यांना शिवीगाळ केली.

आरोपीने धारदार हत्याराने जैस्वाल यांच्या हातावर वार केला. आरोपींनी पान टपरीची तोडफोड करुन नुकसान केले.

get_footer();