आवृत्ती पुणे
← Back to Homepage

एस टी कर्मचाऱ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • February 17, 2024
Spread the love

डॉ.राहुल घुले यांचा विधायक पुढाकार

भूम : डॉ.राहुल घुले यांच्या पुढाकाराने एस टी कर्मचाऱ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मागील अनेक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांची जीवन वहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस टी च्या भूम आगारातील कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

शुक्रवारी दुपारी शेकडो एस टी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळाने संपर्क कार्यालयात भेट देऊन डॉ.राहुल घुले यांच्याशी फोनवरून चर्चा केली व पिण्याच्या पाण्याची मागणी केली.

डॉ.राहुल घुले यांनी क्षणाचाही विलंब न करता उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन २४ तासात कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचा टीम ला आदेश दिला. गुरुवर्य भिमराव घुले व आगार प्रमुख लांडगे यांच्या हस्ते पिण्याच्या थंड पाण्याचे फीत कापून उदघाटन करून लोकार्पण केले.

डॉ.राहुल घुले यांच्या वतीने मागील अनेक महिन्यापासून भूम परांडा वाशी तालुक्यातील नागरिकांना मोफत ऑपरेशन, शेतकऱ्यांच्या जळालेल्या डी पी ची मोफत वाहतूक यासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असून याचा अनेक गरजू नागरिकांना प्रत्यक्ष फायदा झालेला आहे.

सर्व कर्मचारी बांधवांनी डॉ. राहुल घुले यांचे आभार मानले. यावेळी आगारातील प्रदीप लोखंडे,मिलिंद वाघमारे,नामदेव नागरगोजे, सुदाम कवडे, वैभव हाराळ, गणेश वाघमारे, भारत साठे, गणेश गायकवाड, मांजरे, पवार यांच्यासह मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय शेंडगे, उपाध्यक्ष हरीश गाढवे व सर्व सदस्य उपस्थित होते.

वरिष्ठ स्तरावर वारंवार पिण्याच्या पाण्यासाठी पाठपुरावा करून देखील सोय होत नव्हती मात्र डॉ.राहुल घुले यांनी तात्काळ दखल घेऊन अवघ्या २४ तासात पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली.

याचा सर्व कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.असे मत भूमचे आगार प्रमुख दिपक लांडगे यांनी व्यक्त केले. डॉ.राहुल घुले यांनी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना मोफत पिण्याच्या पाण्याची सोय करून खूप मोठा वाटा उचलला आहे,आमची अनेक दिवसांची चिंता मिटली आहे अशी भावना कर्मचारी नामदेव नागरगोजे यांनी व्यक्त केली.

get_footer();