आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कत्तलीसाठी नेणाऱ्या गायीना गोरक्षकांनी वाचवले

Spread the love

वैराग पोलिसानी केला गुन्हा दाखल

सोलापूर : कत्तलीसाठी २८ गोवंश व म्हशीची वासरे घेऊन जाणाऱ्या वाहनास गोरक्षकांनी अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईत २ लाख एक हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी वैराग पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. वैराग बार्शी तालुक्यातील दहिटणे ते मुंगशी (वा) रोडवर नदीजवळ धाराशिवकडे या गोवंशाना नेले जात होते. ही घटना रविवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याचे सुमारास घडली.

याबाबत संशयित आरोपी दस्तगीर केंडाजी कुरेशी (वय २२) रा. मोहोळ (ता.मोहोळ) याच्यावर पोलीस कॉन्स्टेबल शरद पाटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपीने वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने सुमारे ५१ हजार रुपयाची लहान वासरे कोंबली होती. कत्तलीसाठी धाराशिव येथे घेवुन जात असताना त्याला मुंगशी येथे पकडले.

get_footer();