आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कमी किमतीत शेअर देण्याच्या बहाण्याने फसवणूक

Spread the love

पुणे : कमी किमतीत शेअर देण्याच्या बहाण्याने धायरीतील एका तरुणाची २३ लाख ७५ हजाराची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी एका ३० वर्षीय तरुणाने तक्रार दिल्याने सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना एका अनोळखी मोबाईल धारकाने ग्रुपमध्ये अॅड करून घेतले. व एक लिंक पाठवून ती डावूनलोड करावयास सांगितले.

डिस्काऊंट किंमतीत शेअर्स घेता येतील यातुन चागंला मोबदला मिळवता येईल असे खोटे आमिष दाखवले. २८ मे ते २० जून या काळात वेळोवेळी ट्रेडिंग करावयास सांगुन फिर्यादीची २३,७५,०००/-रु.ची आर्थिक फसवणूक केली. हा तपास पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहेत.

get_footer();