आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कस्टडीतुन पळालेला आरोपी अवघ्या ४ तासात जेरबंद

Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : युनिट-५ गुन्हे शाखा, पुणे शहर पोलीस कस्टडीतुन पलायन केलेल्या रेकॉर्डवरील आरोपीस अवघ्या ४ तासात जेरबंद करण्यात पोलीसाना यश आले आहे.

पोलीसांनी संदिप बाबुलाल यादव (वय ३० वर्षे रा. जिल्हा परिषद शाळेसमोर, हांडेवाडी चौक, होळकरवाडी, पुणे), गोविंद उर्फ पिंट्या हनुमंत घोडखे (वय २४ वर्षे रा. गल्ली नंबर ५. वरदविनायक कॉलणी, गंगानगर, हडपसर पुणे) यांना ताब्यात घेऊन तपासकामी हडपसर पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले होते.

दि. २२ जून रोजी सुमारे दिड वाजे दरम्यान वर वाहन चोरीच्या गुन्हयातील आरोपीतांची फिंगरप्रिन्ट काढणेकामी त्यांना हडपसर पोलीसांनी लॉकअपमधुन बाहेर काढले असता पोलीसांची नजर चुकवुन आरोपी नामे गोविंद उर्फ पिंटचा हनुमंत घोडखे पळुन गेला होता. त्याचे विरुध्द हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

दाखल गुन्हयातील नमुद आरोपीचा शोध घेण्यासाठी हद्दीत नाकाबंदी व पेट्रोलिंग करण्याचा आदेश वरिष्ठांनी.दिला होता. त्याप्रमाणे लागलीच गुन्हे शाखा, युनिट-५ कडील पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे यांनी यूनिट कडील अधिकारी व अंमलदार यांच्या दोन टिम तयार करुन एक टिम पुणे कॅम्पात व एक टिम पुर्वेला आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केली.

आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना बातमी मिळाली की, गोविंद उर्फ पिंटया घोडखे हा वडकी येथील सकाळ प्रेसच्या पाठीमागे जंगलामध्ये लपून बसलेला आहे. पोलीस पथकाने येथील जंगलात जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी गोविंद उर्फ पिंट्या घोडखे हा एका झाडाखाली लपुन बसलेला दिसला.

पोलीसांना पाहुन पळून जाऊ लागल्याने आरोपी गोविंद उर्फ पिंट्या हनुमंत घोडखे यास लागलीच स्टफचे मदतीने ताब्यात घेतले. सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त, गुन्हे. अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, दया शेगर, विनोद शिवले, अमित कांबळे, अकबर शेख यांनी केलेली आहे.

get_footer();