आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कांद्यावरील निर्यात बंदी अखेर उठवली

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • February 19, 2024
Spread the love

केंद्राचा शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना दिलासा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अखेर कांद्यावरील निर्यात बंदी उठवत शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे.

डिसेंबर महिन्यात कांद्याचे बाजार भाव 4 हजार रुपयांवर गेल्याने बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यात बंदी उठवण्याची मागणी करण्यात येत होती.

केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी कांद्याची निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याचे बाजार भाव 800 ते 1000 रुपये पर्यंत कोसळल्याने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी यासाठी व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनी जोरदार मागणी केली होती.

अखेर सव्वा दोन महिन्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा देत, तीन लाख मॅट्रिक टनापर्यंत कांदा निर्यातीला परवानगी दिली असून बांगलादेश येथे पन्नास हजार मॅट्रिक टन तर इतर देशांमध्ये अडीच लाख मॅट्रिक टन कांदा निर्यात करता येईल अशी घोषणा केली.

अखेर दोन महिन्यानंतर कांदा निर्यात बंदी उठवली दरम्यान, औषधी म्हणून समजला जाणारा सफेद कांदा आणि रोजच्या आहारात लागणारा लाल कांदा आणि कोणत्या राज्यातून किती कांदा निर्यात केला जाणार याबाबत आदेश न निघाल्यामुळे मात्र अस्पष्टता आहे.

निर्यातबंदी खुली केल्याने कांद्याचे आज काय बाजार भाव निघतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तातडीने कांदा निर्यात बंदी खुली करत आदेश काढावा आणि संपूर्ण कांद्याची निर्यात बंदी खुली करावी अशी मागणी शेतकऱ्यांचे व्यापारी करत आहे.

संपूर्ण कांद्याची निर्यात बंदी खुली करण्याची मागणी जागतिक लेव्हल आणि आखाती देशाच्या दबावामुळे निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागला असून शेतकऱ्यांनी मागणी केली. त्यावेळी जर निर्णय घेतला असता तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता अशी प्रतिक्रिया मुंबई बाजार समिती संचालक तथा कांदा तज्ञ जयदत्त होळकर यांनी दिली आहे.

केंद्राने 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला वास्तविक पाहता हा 3 लाख मेट्रिक टन हे कमी आहेत. जास्तीत जास्त कांदा हा देशाबाहेर गेला पाहिजे, जेणेकरून कांद्याचे भाव स्थिर होऊन शेतकऱ्यांचा लागवडीचा आणि इतर खर्च फिटून दिलासा मिळेल म्हणून यावर केंद्राने लवकरात लवकर निर्णय घ्यावा.

get_footer();