कुरिअर मध्ये एम. डी. ड्रग्ज असल्याचे सांगून फसवणूक
सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तुम्ही पाठवलेल्या कुरिअर मध्ये ड्रग आहेत.असे खोटे सांगून पोलीस अधिकारी बोलत असल्याचे भासवून एका महिलेची१० लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखीमोबाईल धारक यांने कॉल करुन फेड-एक्स कुरियर मधुन बोलत असल्याचे सांगुन आपले इराणला जाणारे कुरियर मध्ये काही अवैध एम. डी. ड्रग्ज मिळाले आहे.
असे खोटे सांगून मेन ऑफिसचे नंबरला फोन जोडुन दिल्यावर व्हीडीओ कॉल केला आणि फिर्यादी यांना प्रदिप सावंत नावाच्या पोलिस अधिकाऱ्याचे आयडी कार्ड दाखवून आपणाकडुन मनिलाँड्रिग सारखा अपराध झाला आहे. अशी भिती घालून फिर्यादी यांची १०,००,०००/- रुपयेची आर्थिक फसवणूक केली आहे. हा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार करीत आहेत
