आवृत्ती पुणे
← Back to Homepage

के.टी.एस.परीक्षेचे बक्षीस वितरण संपन्न

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • February 23, 2024
Spread the love

बार्शी : डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेच्या वतीने कर्मवीर टॅलेंट सर्च (के.टी.एस) ही परीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा यशंतराव चव्हाण मध्यवर्ती हॉल या ठिकाणी महाराष्ट्र विद्यालयाकडून सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी सतीश अंधारे हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे खजिनदार तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख जयकुमार शितोळे हे होते.

सोबत संस्था सहसचिव ए.पी.देबडवार, संस्था समिती सदस्य बी.के.भालके, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी.सपताळे, पर्यवेक्षक एस.सी.महामुनी, पर्यवेक्षक एन.बी.साठे, प्रा संजय बागल व प्रा.किरण गाढवे उपस्थित होते.

या कार्यक्रमात इयत्ता पाचवीतील उत्कर्ष डमरे, स्वरा निकम, ईशांत कआशईद इयत्ता सहावीतील आर्यन दमामे, खुशी डुमणे, नंदिनी बोराडे इयत्ता सातवीतील रणवीर गुंड,सयमी भोसले, आशुतोष भुसारे इयत्ता आठवीतील विश्वभारती अंधारे, शिजासदफ पठाण, सृष्टी पाटील, इयत्ता नववीतील भक्ती गुंड, वेदांत डुबे, यश देशपांडे इयत्ता दहावीतील सुदर्शन सांगडे, सिद्धी चव्हाण, सिद्धी काळे या यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या के.डी.धावणे यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कसबे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.किरण गाढवे यांनी केले.

get_footer();