आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोंढवा व कात्रजच्या तरुणाकडून पिस्टल जप्त

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : तळेगाव दाभाडे परिसरात पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे.

पुण्यातील कोंढवा व कात्रज भागातील तरुणाचा त्यात समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींकडून दोन लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चार पिस्टल व सहा जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई पिंपरी गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने शनिवारी केली आहे.

ओमकार उर्फ बंटी दत्ता आसवले (वय 20 रा. टाकवे मावळ), समर्थ संभाजी तोरणे (वय 19 रा. कात्रज तलावाजवळ, कात्रज) व अमन मेहबूब शेख (वय 19 रा. काकडे वस्ती, कोंढवा) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुंडाविरोधी पोलीस पथकातील शिपाई शुभम तानाजी कदम (वय-28) व रामदास कुंडलिक मोहिते (वय-37) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आरोपींवर भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार आसवले हा जुन्या पुणे – मुंबई हायवेजवळ निलया नाईकनवरे सोसायटी समोर थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आसवले याला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता एक पिस्टल व दोन जीवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन त्याला अटक केली.

get_footer();