आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोंढव्यातील ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, Social • June 11, 2024
Spread the love

कात्रज-कोंढवा रस्ता : खड्ड्यातील पाण्यात बुडून झाला होता मुलीचा मृत्यू

पुणे : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून एका मुलीचा मृत्यू झाला होता, याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी या कामाचे ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना 8 जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली होती.याबाबत जगदीश छगन शिलावट (वय-35 रा. केसर लॉज मागे, महाकाली मंदिराजवळील मोकळ्या मैदानात, कोंढवा बु) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यावरुन खडीमशिन चौक ते कात्रज कडे जाणाऱ्या नवीन रोड तयार करणाऱ्या संदीप पटेल, पटेल इंटरप्रायजेस (शिवाजीनगर, पुणे) या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला आहे. शिलावत कुटुंबीय कात्रज-कोंढवा रस्त्यावरील मोकळ्या जागेत झोपडी बांधून राहतात.

शनिवारी सकाळी सरगम जगदीश शिलावत (वय-15), जनुबाई रमेश शिलावत (वय-16), तेजल जगदीश शिलावत (वय-12), मुस्कान देवा शिलावत (वय-16) या चौघी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मुस्कान खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात पाय घसरुन पडली. चौघी पाण्यात बुडाल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.

त्यानंतर जवानांनी चौघींना बाहेर काढले. बेशुद्धवस्थेतील मुस्कान हिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषीत केले. ठेकेदाराने खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते.

सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे तपासात उघडकीस आले. या प्रकरणी पुणे शहरातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांनी आवाज उठवला, आंदोलन केली होती. त्यामुळे पोलिसांनी ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील करीत आहेत.

get_footer();