आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोयता बाळगणाऱ्या तडीपार आरोपीला केले जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), Other, Police • February 15, 2024
Spread the love

कोंढवा पोलीसांची कामगिरी

पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार आरोपीला जेरबंद करण्यात यश आले आहे. कोंढवा पोलीसांनी ही कामगिरी केली आहे.

अरबाज पटेल, (वय २० वर्षे, रा. पवार हाईट्स तिसरा मजला फलॅट नं.३०२, काकडेवस्ती, कोंढवा) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याकडुन तडीपार करण्यात आलेल्या आरोपी यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

हे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांनी दिले. आदेशाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, व तपास पथक तडीपार आरोपी पोलीस ठाणे हद्दीत लपुन राहत आहेत का याबाबत तसेच त्याच्या प्राप्त पत्यावर वेळोवेळी जाऊन शोध घेत होते.

दरम्यान पोलीस अंमलदार अमोल हिरवे यांना कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तडीपार गुन्हेगार अरबाज पटेल हा काकडेवस्ती येथील लेन नं.३ समोर पी.जे.के. एम. स्कुलच्या शेजारील चालु बाधंकाम बिल्डींग मध्ये झोपलेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती.
माहितीनुसार तपास पथकातील स्टाफ यांना या ठिकाणी म्हणजे काकडेवस्ती लेन नं.३ समोर पी.जे.के.एम. स्कुलच्या शेजारील चालु बाधंकाम बिल्डींग मध्ये एक व्यक्ती झोपलेला दिसुन आला.

या झोपलेल्या व्यक्तीजवळ जाऊन खात्री केली असता तो आरोपी असल्याचे सिद्ध झाले. त्याला ताब्यात घेतले असताना त्याच्या अंथरुणाखाली एक लोखंडी सतुर सारखे हत्यार ठेवलेले आढळून आले.

हे हत्यार त्याच्याकडुन जप्त करण्यात आले आहे. आरोपी याला पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार केले असताना तो कायदेशीर परवानगी न घेता तडीपार आदेशाचा भंग करुन पुणे शहराच्या हद्दीत विनापरवाना प्रवेश करुन लोखंडी सतुर हे शस्त्र जवळ बाळगलेला मिळून आला आहे.

कोंढवा पोलीस ठाणे येथे त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आले आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त. परि.०५ आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग शाहुराव साळवे, यांच्या मार्गदशनाखाली दिनेश पाटील, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, विकास मरगळे, राहुल थोरात, सुहास मोरे, अभिजीत जाधव, आशिष गरुड, रोहित पाटील यांनी केली आहे.

get_footer();