आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोल्डड्रिंक्सच्या बाटल्या न दिल्यामुळे पान टपरी चालकाला मारहाण

Spread the love

हडपसर परिसरातील घटना

पुणे : कोल्डड्रिंक्सच्या बाटल्या मागूनही न दिल्यामुळे चार जणांनी मांजरी येथे एका पान टपरी चालकाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी राजेशकुमार सिंग (रा. मांजरी) यांनी फिर्याद दिली आहे. टोळक्याने त्यांना मारहाण करून शॉपची तोड फोड केली. पोलिसांनी एकास अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार राजेशकुमार सिंग (वय ३५ वर्षे, रा. मांजरी बुद्रुक) हे दि.१२ जून रोजी ७:३० च्या सुमारास पान टपरी साडे सतरा नळी चौक, हडपसर, पुणे येथे दुकानामध्ये बसलेले असताना पुर्वी त्यांचे परिसरात राहणारे चार इसमांनी त्यांना स्टींग कोल्ड्रींगचे एकूण ४० बॉटल्स् मागीतल्या.

फिर्यादी यांनी त्यास नकार दिल्याचा राग मनात धरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे कडील लोखंडी हत्याराने डोक्यावर, मानेवर वार करुन दुखापत केली. तसेच फिर्यादी यांच्या भावाच्या दुकानातील चहा बनविण्याची मशिन व इतर सामान फोडून नुकसान केले.

त्यानंतर हातातील लोखंडी हत्यारे हवेत फिरवून दहशत निर्माण केली. व जमलेल्या लोकांना शिवीगाळ करुन तेथून पळून गेले. हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अमोल गाडेकर (वय २९, रा. साडे सतरा नळी चौक) यास अटक केल्याची माहिती पोलिस उप निरीक्षक हसन मुलाणी यांनी दिली.

get_footer();