आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोल्हापूरमध्ये ‘महा सिक्युरटेक एक्स्पो २०२५’ यशस्वी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • December 25, 2025
Spread the love

पुणे : दक्षिण महाराष्ट्रातील तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक सुरक्षा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला ‘महा सिक्युरटेक एक्स्पो दक्षिण महाराष्ट्र’ कोल्हापूर येथे उत्साहात पार पडला. अत्याधुनिक तंत्रज्ञान, लाईव्ह डेमो आणि व्यावसायिक नेटवर्किंगसाठी हा एक्स्पो प्रभावी मंच ठरला.

इशा डिजिटलचे एमडी व सीईओ राहुल मुथा यांच्या वतीने आयोजित ‘महा सिक्युरटेक एक्स्पो दक्षिण महाराष्ट्र’ दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी रामकृष्ण लॉन अँड हॉल, शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे यशस्वीपणे पार पडला. दक्षिण महाराष्ट्रातील तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक सुरक्षा क्षेत्रासाठी हा एक्स्पो एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरला.

या एक्स्पोमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, इचलकरंजी, सोलापूर, उरण इस्लामपूर, कोकण विभाग, गोवा तसेच इतर टियर-३ शहरांमधील सिस्टीम इंटिग्रेटर्स, वितरक आणि चॅनल पार्टनर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

एक्स्पोचे उद्घाटन आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. आरपी टेक इंडिया, पुणे येथील शाखा प्रमुख पवन सराफ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी अमल महाडिक यांनी तंत्रज्ञान व सुरक्षा क्षेत्रातील वाढत्या संधी आणि भविष्यातील आव्हानांवर मार्गदर्शन केले.

यावेळी संजय घोडावत ग्रुपचे संजय घोडावत यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांना विशेष प्रेरणा दिली. तसेच घाडगे पाटील ग्रुपचे आदित्य पाटील, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अनिल बागणे, स्फूर्ती ग्रुपचे चिराग मेहता तसेच सायबर सेलचे अधिकारी यांचीही उपस्थिती लाभली.

एक्स्पोमध्ये IT इन्फ्रास्ट्रक्चर, CCTV सर्व्हेलन्स, संगणक प्रणाली, अ‍ॅक्सेस कंट्रोल, सॉफ्टवेअर सोल्युशन्स, प्रिंटर्स, फायर सेफ्टी, डिस्प्ले टेक्नॉलॉजी तसेच AI आधारित इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सोल्युशन्सचे सादरीकरण करण्यात आले. प्रत्यक्ष प्रशिक्षण, लाईव्ह डेमो आणि उत्पादनांची सविस्तर माहिती मिळाल्यामुळे सहभागी प्रतिनिधींना मोठा लाभ झाला.

प्रामा इंडिया प्रा. लि., राशी पेरिफेरल्स लि. आणि हिकव्हिजन इंडिया प्रा. लि. हे एक्स्पोचे टायटल स्पॉन्सर्स होते. नेटगियर, वेस्टर्न डिजिटल, इम्पॅक्ट बाय हनीवेल, ESSL, मॅट्रिक्स, व्ह्यू-सॉनिक, डी-लिंक, TP-Link, QNAP, ब्रदर, सँडिस्क, ल्युमिनस, EATON यांसह ४० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्सनी आपल्या अत्याधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन केले.

या एक्स्पोसाठी १,४०० हून अधिक नोंदण्या झाल्या असून १,००० पेक्षा अधिक अभ्यागतांनी प्रत्यक्ष भेट दिली. कोल्हापूर कॉम्प्युटर असोसिएशन, सांगली कॉम्प्युटर अँड मीडिया डीलर्स असोसिएशन, इचलकरंजी तसेच उरण इस्लामपूर कॉम्प्युटर असोसिएशन यांचा सक्रिय सहभाग लाभला.

एक्स्पोच्या प्रवेशद्वारावर साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक व भविष्यकालीन AI रोबोटने सर्व उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित या रोबोटमुळे कार्यक्रमाला आधुनिकतेची खास ओळख मिळाली. अनेक अभ्यागतांनी या अनोख्या आकर्षणासोबत छायाचित्रे काढत कौतुक व्यक्त केले.

ईशा डिजिटलचे एमडी व सीईओ राहुल मुथा यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. संचालिका सोनाली मुथा तसेच उपाध्यक्ष सुभाष पाटील, समद पठाण, मयुरेश दिसले, अशोक गायकवाड आणि नवनाथ कोबल यांच्या मार्गदर्शनामुळे हा एक्स्पो एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला.

ईशा डिजिटलने यापूर्वी महाराष्ट्रात चार यशस्वी एक्स्पोचे आयोजन केले असून, भविष्यातही अशाच तंत्रज्ञानप्रधान आणि व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

get_footer();