आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खडकीत कारच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : दीड महिन्यापासून शहर व परिसरात सुरु झालेले अपघातांचे सत्र अजूनही थांबलेले नाही. रविवारी रात्री खडकी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल कर्मचारी पी.सी. शिंदे आणि पोलीस हवालदार समाधान कोळी यांना मध्यरात्री एक वाजून ४० मिनिटांनी सुमारास अज्ञात कारने धडक दिली. त्यात कोळी यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हा अपघात खडकी अंडरपास, हॅरिस ब्रिज जवळ घडला. त्यात पोलीस हवालदार कोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर शिंदे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खडकी पोलीस बेपत्ता कार व चालकाचा शोध घेत आहेत. गेल्या दीड महिन्यापूर्वी शहरात कल्याणी नगर मधून हिट अॅड रन अपघात सुरु झाले. त्यावेळी दुचाकी वरील तरुण व तरुणी ठार झाले होते.

त्यानंतर मार्केटयार्ड – गंगाधाम, नांदोशी, धायरी, नऱ्हे, कात्रज भागात असे जीव घेणे अपघात झाले आहेत. आता तर गस्त घालणाऱ्या बीट मार्शल पोलिसांनाच भरधाव कार ने उडवले आहे.

get_footer();