आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खडकीत ज्येष्ठ नागरिकांची साडेसात लाखाची फसवणूक

Spread the love

पुणे : महावितरणचा अधिकारी असल्याचे सांगून खडकितील एका ज्येष्ठ नागरिकांची तब्बल साडेसात लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे.

या प्रकरणी प्रवीण जोशी (वय ६५, राहणार बोपोडी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अधिकाऱ्याने जेष्ठ नागरिकाला वीज बिल न भरल्या बद्दल विचारणा केली व त्याच्या मोबाईल मध्ये एप्लिकेशन्स डाऊनलोड करून बिल भरण्यास सांगितले.

या प्रकरणात त्याची ७,६३,००० रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. पोलिसांनी अनोळखी सायबर चोरट्या वर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक गजानन चोरमले तपास करीत आहेत.

get_footer();