आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खडक पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई, चौघांना अटक

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : अवैध धंद्याविरोधात खडक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत पोलिसांनी लोहियानगर, काशेवाडी परिसरातील मटका, जुगार, अवैध दारू धंद्यांवर छापा टाकून चौघांना अटक केली आहे.

रोहित महादू अवघडे (वय १९ वर्षे), लक्ष्मी महादू अवघडे (वय ४५ वर्षे), राकेश मोहन कांबळे (वय ४८ वर्षे) आणि शोभा लक्ष्मण जाधव (वय ४८ वर्षे, सर्व रा. काशेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली.

आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खडक पोलिस ठाण्यातील पोलिसाना माहिती मिळाली की, काशेवाडी भागात बागवे पतपेढी समोर महाराष्ट्र पान शॉप शेजारी अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलीस पथकाने काशेवाडी येथे हातभट्टी धंद्यावर छापा टाकला. या कारवाईत ३१ हजार ३४० रुपयांची ३१० लिटर दारू जप्त केली. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलिस अंमलदार सहायक पोलिस फौजदार गांगुर्डे, पोलिस अंमलदार चौधरी, राऊत, उईके, सोयाम यांच्या पथकाने केली.

get_footer();