आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खासदार ओमराजे निंबाळकर यांना विजयी करा

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • February 5, 2024
Spread the love

जिल्हा संपर्कप्रमुख सुनिल काटमोरे यांचे आवाहन

भुम : हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने पक्षप्रमूख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठया मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्नशिल राहावे असे आवाहन धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख सुनिल काटमोरे यांनी केले आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार भूम, परंडा, वाशी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी यांची भूम येथील विश्रामगृहावर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शाखाप्रमुख प्रमुख तालुकाप्रमुख, विभाग प्रमुख ज्या ठिकाणी नाहीत त्या ठिकाणी तात्काळ निवड करण्यात यावी तसेच पदाधिकारी निष्क्रिय आहेत त्या ठिकाणी निवडण्यात यावेत असे त्यांनी आवाहन केले. या बैठकीसाठी जिल्हाप्रमुख रणजित पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉ चेतन बोराडे, प्रदिप मेटे महिला जिल्हा प्रमूख जिनत सयद, परांडा तालुका प्रमुख मेघराज पाटील, भूम तालुका प्रमूख ॲड श्रीनिवास जाधवर, युवासेना विधान सभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, उपतालुकाप्रमुख अब्दुल सय्यद ”रामभाऊ नाईकवाडी, युवा सेना शहरप्रमुख अविनाश जाधव, युवासेना विधानसभा चिटणीस गोविंदराज शाळू, ॲड विनायक नाईकवाडी, सरपंच परिषद राज्य संघटक कोहिनूर सय्यद महिला आघाडी ता प्रमुख उमादेवी रणदिवे, राजाभाऊ नलावडे, लहू गोरे, सरफराज कुरेशी, अशोक वनवे, श्रीमंत भडके आदी शिवसैनिक उपस्थित होते.

get_footer();