आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खून करुन १३ वर्ष फरार आरोपी राजस्थानमध्ये जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police • January 23, 2024
Spread the love

चतुःश्रृंगी पोलीसांची कामगिरी

पुणे : खून करुन १३ वर्ष फरार असलेल्या आरोपीला राजस्थान येथुन जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. चतुःश्रृंगी पोलीसांनी ही कामगिरी केली आहे. बिट्टी ऊर्फ शामबाबु यादव (वय-३३, रा.मुं.पो.हरा. पो. पहाडी, ता. करवी, जि. चित्रकोट, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सुपरवायझर बाबुराव मोघेकर हे अंबिका सोसायटी, प्लॉट नं २०, सेनापती बापट रोड, येथे कन्स्ट्रक्शन साईटवरील वॉचमन राजा ऊर्फ रज्जवा यादव, बिट्टी ऊर्फ शामबाबु यादव यांना चेक करण्यासाठी गेले. त्यांचा वॉचमन यांना राग येऊन त्यांच्यात वादावादी झाल्याने दोन्ही वॉचमन हे बाबुराव मोघेकर यांना अंबिका सोसायटी मधील लिफ्टमध्ये तोंडात कापडी बोळा कोंबुन व त्यांचे दोन्ही हात रस्सीने व दोन्ही पाय रस्सी व सॉक्सने बांधुन त्यांचा खुन करुन पसार झाले होते.
या गुन्ह्यातील फरार आरोपी श्याम यादव हा स्वतःचे अस्तित्व लपवुन नाव बदलुन विविध राज्यांमध्ये वावरत होता. याबाबत माहिती प्राप्त झाल्याने आरोपीचे अस्तित्व तांत्रिक विश्लेषनाद्वारे निष्पन्न करुन तो राजस्थान राज्यातील झालावाड जिल्ह्यात नाव बदलुन राहत असल्याची माहीती प्राप्त झाली होती. त्यानुसार चुतःश्रृंगी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक पिडावा, जि. झालावाड, राज्य राजस्थान या ठिकाणी गेले. फरार आरोपीपैकी बिट्टी ऊर्फ शामबाबु यादव याचा शोध घेतला असता, तो त्याठिकाणी राधेश्याम या नावाने राहत असल्याचे समजले होते.
या आरोपीस सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेतल्यास तोच बिट्टी ऊर्फ शामबाबु असल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करुन झालावाड येथील न्यायालयात हजर करुन ट्रान्झीट रिमांड प्राप्त करुन, आरोपीसह पोलीस पथक पुण्यात हजर झाले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, गुन्हे, अंकुश चिंतामण, पोलीस उपनिरीक्षक, अंगत नेमाने, पोलीस अंमलदार, सचिन कांबळे, सुहास पोतदार, सुधाकर माने, अस्लम अत्तार, गोकुळ घुले यांचे पथकाने केली आहे.

get_footer();