आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खेळाडू व क्रीडा संस्था यांच्या कायम पाठीशी – राजकुमार चोरडिया

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), Other, People, Social • February 12, 2024
Spread the love

प्रविण उद्योग समूहाच्या वतीने दृष्टी संस्थेला २ लाख रुपयांचा धनादेश

पुणे : आपल्या देशाचे नाव उंचविणाऱ्या खेळाडू आणि क्रीडा संस्थांच्या पाठीशी आम्ही कायम उभे असू, असा विश्वास प्रविण उद्योग समूहाचे अध्यक्ष राजकुमार चोरडिया यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू आणि मार्गदर्शक संस्थांना दिला.

प्रवीण मसालेवाले यांच्या वतीने धनुर्विद्या खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या सातारा येथील दृष्टी धनुर्विद्या अॅकॅडमीला मदतीचा हात म्हणून नुकताच रु दोन लाख किमतीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
प्रविण मसालेवाले यांच्या हडपसर येथील कार्यालयात सातारा येथील दृष्टी धनुर्विद्या अॅकॅडमीचे प्रविण सावंत यांनी हा धनादेश स्वीकारला. आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू व राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार विजेती कुमारी अदिती स्वामी, आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू व आशियायी सुवर्णपदक विजेता प्रथमेश फुगे, राष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू साहिल जाधव यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. प्रविण उद्योग समूहाचे संचालक विशाल चोरडिया व आनंद चोरडिया हे यावेळी उपस्थित होते.
सातारा येथील दृष्टी धनुर्विद्या अॅकॅडमीच्या विकासास आवश्यक असलेले योगा प्रशिक्षण केंद्र व अभ्यासिका यासाठी बहुउद्देशीय सभागृह उभारणी करण्यासंबंधात संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन राजकुमार चोरडिया यांनी दिले. तसेच प्रविण सावंत यांच्याकडे त्यासाठी आर्थिक सहाय्याचा पहिला दोन लाख रुपये किंमतीचा धनादेश सुपूर्त देखील केला. याप्रसंगी प्रथमेश फुगे, अदिती स्वामी या खेळाडूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
एकाच वर्षात दोन अर्जुन अवार्ड मिळविलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे क्रीडा मार्गदर्शक प्रविण सावंत यांनी प्रविण उद्योग समूहाचे योगा प्रशिक्षण व अभ्यासिका यासाठी बहुउद्देशीय सभागृह उभारणीस आर्थिक सहाय्य दिल्याबद्दल आभार मानले. नजीकच्या भविष्यात दृष्टी धनुर्विद्या अॅकॅडमीच्या योगा प्रशिक्षण केंद्र व अभ्यासिकेसाठी प्रवीण मसालेवाले हे किमान ७ लाख रुपयांची मदत करतील असे आश्वासन देखील यावेळी चोरडिया यांनी दिले.

get_footer();