आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गणेश मंदिरात गाढवे दाम्पत्याच्या हस्ते महाआरती

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, People, Social • February 14, 2024
Spread the love

भुम : समर्थ नगर विघ्नहर्ता गणेश मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व संयोगिता गाढवे यांच्या हस्ते महाआरती करून जन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

सायंकाळी ६ ते ८ श्री ची पालखीतुन समर्थ नगर परिसरात मिरवणुक काढण्यात आली. प्रारंभी सकाळी श्री ची महापूजा होऊन ८ ते ९ या वेळेत वेदशास्र संपन्न राजाभाऊ धर्माधिकारी यांच्या मंत्रोउच्चारात सामुदाईक हवन संपन्न झाले. यानंतर हभपसागर महाराज कोल्हे यांचे किर्तन झाले. यावेळी गुरुदेव दत्त वारकरी संस्था बार्शी येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. दुपारी १२ वाजता फुले उधळून जन्म उत्सव साजरा करण्यात आला. यानंतर माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यानंतर दुपारी पाच वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शहरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी श्री विघ्नहर्ता गणेश मंदीराच्या सेवेधारी मंडळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

get_footer();