आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गहाळ झालेले २ लाखाचे १३ मोबाईल हस्तगत

Spread the love

सायबर पथकाची कारवाई

पुणे : सायबर पथकाकडून, गहाळ झालेले सुमारे २,१०,००० किंमत रुपयांचे १३ मोबाईल हस्तगत करण्यात यश आले आहे.

केंद्र शासनाच्या दुरसंचार विभागाद्वारे हरवलेल्या/चोरीस गेलेल्या मोबाईलची माहिती मिळवण्यासंदर्भात (Central Equipment Identiy Register CEIR) ही प्रणाली सुरू करण्यात आली होती.

केंद्र शासनाच्या CEIR प्रणालीचा वापर डेक्कन पोलीस ठाण्याकडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक, विपीन हसबनीस, महिला पोलीस अंमलदार उमा पालवे, सरोजा देवर, सुप्रिया सोनवणे व पोलीस अमंलदार रोहित पाथरुट यांच्या टिमने केला.

CEIR प्रणालीवर वेगवेगळया राज्यात तसेच महाराष्ट्रातील जिल्हयामध्ये हरवलेले मोबाईल चालु असल्याबाबत माहीती दिसत होती. सायबर टिमने हरवलेल्या मोबाईलची माहिती संकलीत करून त्यानंतर मोबाईल फोन वापरकरर्त्याशी संपर्क साधुन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून एका महिन्यामध्ये नागरिकांचे २,१०,००० रुपये किमतीचे १३ मोबाईल हस्तगत केले.

ही कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ संदीपसिंग गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर सांळुखे यांनी केली आहे.

get_footer();