आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांस केले जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, People, Police • February 1, 2024
Spread the love

युनिट-६ गुन्हे शाखेला यश

पुणे: गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांस जेरबंद करण्यात युनिट-६ गुन्हे शाखेला यश आले आहे.

निखिल नवले (वय २४ वर्षे, रा. रेल्वे स्टेशन विसापुर ता. श्रींगोदा जि.अहमदनगर) आदित्य देशमुख (वय १९ वर्षे रा, हांडेबाई चौक, विसापुर ता. श्रींगोदा जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ४ किलो २२६ ग्रॅम गांजा, गुन्हा करते वेळी वापरलेली मोटार सायकल व ३ मोबाईल फोन असा एकुण १,२९,५२० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट ६ कडील पथक युनिटच्या कार्यक्षेत्रात गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करित असताना आव्हाळवाडी फाटा, वाघोली येथे आले. आव्हाळवाडी फाटा येथुन पायी पेट्रोलिंग करत असताना, वाघोली बाजारतळ भिंती जवळ गेले असता या ठिकाणी दोन व्यक्ती संशयीतरित्या एक बॅग हातामध्ये घेऊन त्यांच्याकडील मोटार सायकलजवळ उभे असलेले दिसले. पोलीस पथकास बघुन ते त्यांच्याकडील दुचाकी गाडीवरुन निघुन जाण्याचा प्रयत्न करु लागले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्या व्यक्तिजवळील बॅगेमध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचा पोलिसांना संशय आला. या ठिकाणावरुन लोणीकंद पोलिस स्टेशनकडील पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करित जात असताना हा संशय आला. त्यांना बोलावुन घेऊन, युनिट कडील पोलीस पथक व लोणीकंद पोलिस स्टेशन कडील पोलीस स्टाफ च्या मदतीने त्यांना त्यांच्या ताब्यातील वाहन व बॅगेसह पळुन जात असताना जागीच शिताफिने पकडले. पोलीस पथकाने त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी त्यांच्या ताब्यातील बॅगेमध्ये व त्यांच्याजवळ काहीतरी संशयास्पद असल्याचा संशय आल्याने, ताब्यातील बॅग हाताने दाबुन पहिल्या.त्यामध्ये झाडपाल्यासारखा कोणतातरी पदार्थ असल्याचे जाणवले. त्यानंतर त्या बॅगेस बाहेरुन वास घेऊन पाहता, तो वास गांजा सारखा उग्र स्वरुपाचा आला. त्यामुळे त्या बॅगेमध्ये गांजा सारखा अंमली पदार्थ असल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील बॅगची झडती घेतली असता, बॅगमध्ये गांजा अंमली पदार्थ मिळुन आल्याने त्यांना अटक करण्यात आली. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे २ सतिश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनिट ६ गुन्हे शाखेचे उल्हास कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंदचे विश्वजीत काइंगडे, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ पडसळकर, तसेच गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, नितीन घाडगे, महेंद्र कडु, ज्योती काळे, सुहास तांबेकर, सागर जगताप, अमोल ढोणे यांनी केली.

get_footer();