आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गुंड अमन दिवेकर आणि दोन साथीदारांवर मोक्का

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police, Social • February 16, 2024
Spread the love

पुणे : अमन दिवेकर (टोळी प्रमुख) व त्याचे २ साथीदार यांचीविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारदार गरीब नवाज मस्जिदमा सोसायटी, हडपसर पुणे येथुन त्यांच्या मोटर सायकलवरून जात असताना तीन इसमांनी संगनमत करून एकाने फिर्यादीचे मोटर सायकलचा हॅन्डल पकडून गाडी बंद करण्यास सांगुन, त्यानंतर दुसऱ्याने धारधार हत्यार लावले व तिस-या इसमाने पाठीमागील खिशातून ४ हजार रु जबरदस्तीने काढुन घेतले व कोणाला सांगीतले तर खलास करून टाकीन अशी धमकी दिली.

फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. दाखल गुन्हयाचा तपास हडपसर पो.स्टे गुन्हे शाखा युनिट पुणे शहर करीत असताना गुन्हे शाखा मुनिट ५ पुणे शहर कडील पोलीस अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावुन पोलीस अमन संजय दिवेकर, (२४ वर्ष जैननगर बिबवेवाडी, पुणे, मुळगांव-दौड, जि. पुणे) (टोळी प्रमुख), विशाल संजय लोखंडे, (वय-२४ वर्ष, रा. इंदीरानगर, अपर डेपो, बिबवेवाडी, मुळगांव-उस्मानाबाद) (टोळी सदस्य) यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असून निधीसंघर्षीत बालक (टोळी सदस्य) यास ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी अमन संजय दिवेकर (टोळी प्रमुख) याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असून त्याने बेकायदेशीररित्या टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी बेकायदेशिर हत्यारे बाळगुन जबर दुखापत करणे, विनयभंग करणे गाडयांची तोड़-फोड करून नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणे, अशा प्रकारे गुन्हे केले आहेत. आर्थिक लाभ व इतर कायदेशीर गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.

हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद शेळके यांनी मा पोलीस उप-आयुक्त परीमंडळ पुणे शहर आर. राजा यांचे मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पूर्ण शहर श्रीकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केलेला होता. गुन्हयाचा पुढील तपास अधीनी राख या करीत आहेत.

get_footer();