आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गुंड दगड्या नेवाळेला पोलिसांनी केले स्थानबध्द

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police • January 22, 2024
Spread the love

पी.सी.बी. गुन्हे शाखेची कारवाई

पुणे: विमानतळ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, ऋषिकेश उर्फ दगड्या नेवाळे या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

ऋषिकेश उर्फ दगड्या नेवाळे, (वय २२ वर्ष, रा. विकासनगर कॉलनी, कलवड वस्ती, लोहगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह समर्थ व विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत तलवार, लोखंडी रॉड, पालघन, कोयता या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, अपहरण दुखापत, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये त्याच्याविरूध्द ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन आनंदराव खोबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा चंद्रकांत बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली. स्थानबध्दतेची ही ८८ वी कारवाई आहे.

get_footer();