आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गुंतवणुकीचा बनाव करून पावणेसहा लाख केले हडप

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र शहरात सुरूच आहे. सायबर चौरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची ५ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला, शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष महिलेला दाखवले होते. चोरट्यांनी महिलेला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले.

महिलेने ऑनलाइन पद्धतीने चोरट्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा मिळाल्याचे भासवले. महिलेच्या मोबाइल क्रमांकावर परतावा मिळाल्या बाबतचा मेसेज पाठवला.

महिलेने परतावा बैंक खात्यात जमा करण्यास सांगितले, तेव्हा चोरट्यांनी टाळाटाळ सुरू केली आणि फोनही बंद केले.गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसात पुणे शहर परिसरात ऑनलाईन माध्यमातून फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. खास करून तरुण महिला व तरुण मंडळी या भामट्यांच्या आमिषाला बळी पडत आहेत व लाखो रुपये गमावत आहेत.पुढील पोलीस तपास सुरु आहे.

get_footer();