आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गुंतवणुक करण्याचे बहाण्याने ४८ लाखांची फसवणुक

Spread the love

पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे बहाण्याने जास्त परतावा देण्याचे अमिष दाखवून विश्वास संपादन करुन ४८,७४,९९४/- रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार कोरेगाव पार्क परिसारत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अनोळखी ने फिर्यादीशी मोबाईल वर संपर्क साधला व त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे आमिष दाखवले. त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना बँक खात्यात वेळोवेळी रकमा जमा करण्यास सांगितले.

मात्र त्यांना काही परतावा मिळाला नाही त्यामुळे ४२ वर्षीय युवकाने फसवणुक झाल्यामुळे अखेर पोलिसात धाव घेतली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरेतपास करीत आहेत.

get_footer();