आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गोलेगावच्या सरपंचपदी सखुबाई शिंदे यांची बिनविरोध निवड

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • January 25, 2024
Spread the love

भुम : भूम तालुक्यातील गोलेगावच्या सरपंचपदी सखुबाई कल्याण शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांनी त्यांचा सत्कार केला. भूम तालुक्यातील गोलेगाव येथील सरपंचपद सहा महिन्यापासून रिक्त होते सखुबाई कल्याण शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नेमिनाथ यशवंत डोके , आकलाख शेख, श्रीमंत भालेकर, दत्तात्रय ठाणाबीर, कमलबाई अनभुले, मनीषा बोराडे, अंकुश डोके, दत्तात्रय डोके, शिवाजी डोके राम बागडे आदी यावेळी उपस्थित होते.

get_footer();