आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ग्रामसभेत ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा ठराव

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • February 7, 2024
Spread the love

बार्शी : बार्शी तालुक्यातील घारी येथे ग्रामसभेत राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यासाठी एक मताने ठराव घेण्यात आला आहे.

शनिवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी घारी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच छाया काशिद यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली. या ग्रामसभेमध्ये राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व सार्वजनिक निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरद्वारे घेण्यासाठी ठराव मांडण्यात आला. ईव्हीएम मशीनबाबत या देशातील मतदारांकडून सातत्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. आपल्या पसंतीच्या उमेदवाराला केलेले मतदान त्यालाच झाले की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या प्रश्नाचे सुयोग्य उत्तर निवडणूक आयोगाकडून मिळत नाही. राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार अबाधित राहण्यासाठी ईव्हीएम मशीनद्वारे घेण्यात येणारे मतदान रद्द करून देशातील सार्वजनिक निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात अशी मागणी करणारा ठराव योगीराज उकिरडे यांनी मांडला. त्यास मिलिंद बनसोडे यांनी अनुमोदन दिले. तसेच पाथरी तलावात खूपच कमी प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध असून ते शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर उपसा होत आहे. त्यामुळे काही दिवसांमध्ये पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असून पाण्याचा होणारा उपसा त्वरित बंद करून पिण्यासाठी व जनावरांसाठी राखीव पाणीसाठा ठेवावा असा ठराव झाला. यावेळी हेमा घावटे, भंडारे, गणेश जगदाळे, प्रशांत जगदाळे, नंदकुमार काशीद, नवनाथ शेळके, काका काशी, अशोक काशिद, दत्तू जगदाळे, रामबसाटी, रमेश जगदाळे, रामलिंग बसवंत, दादा शेळके, योगीराज उकिरडे, मिलिंद बनसोडे, तुकाराम बसवंत, ग्रामविकास अधिकारी दर्शन मंडलिक उपस्थित होते.

get_footer();