आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घटस्फोट देत नसल्याने पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

Spread the love

पुणे : पतीला पत्नीपासून घटस्फोट हवा आहे. मात्र, ती घटस्फोट देत नव्हती. त्यामुळे पतीने तिचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कोथरूड मध्ये घडली आहे.

या दरम्यान पत्नीने पतीकडे घरखर्चासाठी पैसे मागितले. मात्र, घटस्फोट देत नसल्याच्या रागातून ‘खूप झालं तुझं नाटक, संपवूनच टाकतो असे म्हणत पत्नीला मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पतीवर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

भुसारी कॉलनी कोथरूड येथे राहत्या घरी १८ जून रोजी ही घटना घडली. या प्रकरणी ३७ वर्षीय पत्नीने पती विरुद्ध तक्रार दिली आहे. पती पत्नी मध्ये वारंवार भांडणे होत असत. त्यामुळे वैतागून पतीने पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली. मात्र पत्नीने तसे करण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या पतीने तिचा गळा दाबला व जीव घेण्याचा प्रयत्न केला.

get_footer();