आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घरफोडी करणाऱ्याला ३ वर्षाचा सश्रम कारावास

Spread the love

शिवाजीनगर पोलिसांनी रोखल्या चोऱ्या

पुणे : घरफोडी करणा-या गुन्हयातील आरोपीस ३ वर्षाचा सश्रम कारावास व ४,०००रुपये दंडाची शिक्षा ठोठविण्यात आली.

शिवाजीनगर पोलिसांनी ही कामगिरी केली. मंगेश चव्हाण, (वय ३६ वर्षे, रा. एस. एम. शेजारी जोशी हॉल जवळ नाल्यालगत दारूवाला पुल रास्ता पेठ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. यातील फिर्यादी (वय ४१ वर्षे रा. शिवाजीनगर) हे व त्यांचे (सहकारी सी.टी.सर्व्हे नं.११३३/५, निरंकार अपार्टमेंट दुसरा मजला, ऑफिस क्र.४ एफसी रोड मॉडेल कॉलनी शिवाजीनगर ) येथील ऑफिस बंद करून गेले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कश्याच्या तरी सहाय्याने त्यांच्या वरील पत्यावरील तिनही ऑफिसच्या दरवाज्यांचे कोयंडे तोडले. त्याद्वारे आत प्रवेश केला. त्यांच्या ऑफिसमधील एकूण ३४ हजार रुपये किंमतीचे चार लॅपटॉप व रोख रक्कम ४ हजार रुपये असा एकूण ३८ हजार रुपये किंमतीचा माल लबाडीच्या इराद्याने चोरी करून नेला. म्हणून शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उप-निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सचिन तरडे, यांनी केला. सीसीटीव्हीच्या आधारे दाखल गुन्ह्यातील आरोपी याच्याविरुध्द भरपूर पुरावा प्राप्त करून त्याला न्यायालयात आणण्यात आले. न्यायालयात आरोपीविरुध्द गुन्हा सिद्ध झाला. त्यात आरोपी याला ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि ४ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. याकामी सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रियंका वेंगुर्लेकर यांनी काम पाहिले. तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कोर्ट पैरवी पोलिस अंमलदार सहायक पोलिस फौजदार मोहन भापकर, सोनवणे, बेंद्रे यांनी केसचे कामकाज पाहिले.

get_footer();