आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घरफोडी करणाऱ्या कोंढव्यातील शाहरुखला अटक

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Social News, News, News Slider, Police, Social • June 21, 2024
Spread the love

शाहरुख सल्लाऊद्दीन खतीब : स्वारगेट पोलिसांची कामगीरी

पुणे : घरफोडी व मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास स्वारगेट पोलीसांनी जेरबंद केले आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप घुले, सुजय पवार व अनिस शेख यांनी गुन्हयाचे घटनास्थळाचे आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन तांत्रीक विश्लेषनाद्वारे माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा शोध सुरु केला.

पोलीस अंमलदार संदीप घुले, सुजय पवार व अनिस शेख यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील संशयित आरोपी धोबीघाट परिसरामध्ये आला आहे. त्यावरुन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीच्या ठिकाणी जावुन पाहणी केली.

संशयित आरोपी दिसुन आल्याने तो पळुन जाण्याचे तयारीत असताना त्याला घेराव घालुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्याने दोन गुन्हे केले असल्याची कबुली दिली. शाहरुख सल्लाऊद्दीन खतीब (वय २२ वर्षे रा. भाग्योदयनगर गल्ली नं १२ कोंढवा पुणे) यास अटक करुन तपासा दरम्यान त्यांचेकडुन स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या ०२ गुन्हयामधील चोरीस गेलेल्या एकुण ५०,०००/- रु किंमतीचा एक मोबाईल व सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करुन स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले एकुण ०२ गुन्हे उघड केले आहेत.

नंदिनी वग्यानी सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, स्वारगेट पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीता बागवडे यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार संदीप घुले, सुजय पवार, अनिस शेख, शिवा गायकवाड, हर्षल शिंदे, फिरोज शेख, दिपक खेदाड, रमेश चव्हाण, प्रविण गोडसे, यांनी एकत्र मिळुन ही कारवाई केली आहे.

get_footer();