आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चंद्रपूर जिल्हाकारागृहात “वृक्षारोपण” कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हाकारागृहात मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकणी यांच्या हस्ते व कारागृह अधीक्षक अनुपकुमार म. कुमरे यांच्या उपस्थित “वृक्षारोपण” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

बदलत्या काळात पर्यावरणात वाढत चाललेल्या कार्बन डॉयऑक्साईड मुळे सध्या सर्वांचीच समस्या बनली आहे. त्यामुळे जगातील जवळपास सर्वच देश ०५ जून हा जागतीक पर्यावरण दिन म्हणून साजरा करीत असतात, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे हा आहे.”वृक्ष ही पृथ्वीचा दागिना आहे तो आपण खूप चांगल्या प्रकारे सांभाळला पाहिजे.”

असे प्रशांत कुलकणी यांनी यावेळी सांगितले. प्रशांत कुलकर्णी, मुख्य न्यायदंडाधिकारी चंद्रपूर यांनी कारागृह परिसरातील खुल्या जागेवर अशोकाचे झाड लावून वृक्षारोपण केले व कारागृह अधीक्षक अनुपकुमार म. कुमरे यांनी सुध्दा अशोकाचे झाड लावून वृक्षारोपण केले तसेच कारागृहाचे वरीष्ठ तुरुंगाधिकारी नागेश कांबळे, सह सर्व कारागृह अधिकारी कर्मचारी यांनी प्रत्येकी एक-एक झाड लावून वृक्षरोपण केले आहे.

get_footer();