आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चाईल्डहूड कॅन्सर रुग्णांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), Other, People, Social • February 23, 2024
Spread the love

लायन्स क्लबचा पुढाकार

पुणे : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २, इंडियन अकादमी ऑफ पेडिऍट्रिक पुणे, लायन्स क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरचे लायन गिरीश दंडवते आणि ससून जनरल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने १७ फेब्रुवारी रोजी चाईल्डहूड कॅन्सर ऍक्टिव्हीटी अंतर्गत ससून रुग्णालयातील चाईल्डहूड कॅन्सर असणाऱ्या मुलांसाठी रेखाचित्र, चित्रकला, कथा सांगणे, कविता सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यात एकूण ३० मुलांनी उपक्रमांमध्ये सहभागी होत याचा आनंद लुटला. या उपक्रमात लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २चे एकूण २५ क्लब सहभागी झाले होते.

यावेळी लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ तर्फे ससून रुग्णालयात या मुलांसाठी खेळण्याचे क्षेत्र तयार करण्यासाठीचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २चे प्रांतपाल लायन विजय भंडारी, सीईओ लायन श्याम खंडेलवाल, चाईल्डहूड कॅन्सरचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन डॉ. ललित धोका, इंडियन अकादमी ऑफ पेडिऍट्रिकचे अध्यक्ष डॉ. शिरीष कांकरिया, ससून रुग्णालयाचे डीन डॉ. शिंत्रे, बालरोग विभागाच्या एचओडी डॉ. आरती किलीकर, मेडीसीन विभागाचे एचओडी डॉ. बोरसे, कॅन्सरतज्ञ डॉ. चकोर व्होरा, क्लबचे सर्व सभासद व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

get_footer();