आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चाकूच्या धाकाने तरुणाचे १६ लाख केले ट्रान्स्फर

Spread the love

पुणे : चाकूचा धाक दाखवून तरुणाचे १६ लाख रुपये त्याच्या खात्यात जबरदस्तीने ट्रान्स्फर करण्याचा प्रकार बालेवाडी नजीक घडला आहे.

या प्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीनंतर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२२ जुलै रोजी रोजी थर्ड वेव्ह कॅफे समोर, हाय स्ट्रीट, बालेवाडी येथून चार अनोळखी इसमांनी फिर्यादी कडून स्टॉक मार्केटच्या कोर्सची माहिती घेण्याच्या बहाण्याने त्यांच्या गाडीमधून फिर्यादीना नेवून चाकूचा धाक दाखवला.

जिवे ठार मारण्याची धमकी देवून त्यांचे कडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन घेवून पासवर्ड प्राप्त केला व मोबाईल मधील अॅप्लीकेशन मधून फिर्यादीचे १६,०२,५१०/- रु किं.ची युएसडीटी क्रिप्टोकरन्सी ही त्याच्या युएसडीटी चा डिपॉझीट अॅड्रेस वर जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतली आहे. हा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रनील चौगुले करीत आहे.

get_footer();