आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चोरीस गेलेल्या ११ मोटारसायकली ताब्यात

Spread the love

सुमारे साडे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

माढा : चोरीच्या गुन्हयातील चोरीस गेलेल्या एकूण ११ मोटारसायकली ताब्यात घेऊन ८ लाख ६५ हजार रूपये हस्तगत करण्यात माढा पोलिसांना यश आले आहे.

चोरीच्या गुन्हयातील चोरीस गेलेल्या एकूण ११ मोटारसायकली ताब्यात घेऊन ८ लाख ६५ हजार रूपये हस्तगत करण्यात माढा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी उपळाई खु येथील सुहास रमेश कदम (वय २२) याला अटक करण्यात आली आहे.

सुनिल बोकेफोडे (रा. उपळाई रोड पाटील कॉनली बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर) यांची माढा बस स्टॅन्ड परिसरातुन एक हिरो कंपनीची डेस्टनी प्राईम पर्ल सिलव्हर व्हाईट रंगाची ६५,००० रूपये रक्कमेची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली. म्हणून त्यांनी माढा पोलीस ठाण्यास फिर्याद दिली.

या गुन्हयाचा तपास माढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नेताजी बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली माढा शहर बीट येथे कार्यरत असलेले प्रणय शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता. त्याप्रमाणे माढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार गुन्हयातील अज्ञात आरोपी याच्या मागावर असताना त्यानी गुन्हयातील चोरी केलेली मोटारसायकल उपळाई खु येथील संशयीत व्यक्तीने चोरी केली असल्याची माहिती मिळाली.

त्याप्रमाणे संशयीत आरोपी याच्या ठावठिकाणाची माहिती व त्याला उपळाई खु येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हयातील मोटारसायकल चोरी केल्याचे कबुली दिली आहे.

या गुन्हयातील संशयीत आरोपीस या गुहयात अटक करून न्यायालयासमक्ष हजर करून त्याची वेळोवेळी पोलीस कस्टडी घेऊन तपास केला असता त्याने माढा पोलीस ठाणे, कुडूवाडी पोलीस ठाणे, दहिसर पोलीस ठाणे, बोरिवली पोलीस ठाणे मुंबई, परिसरातुन गाडया चोरी केल्याची कबुली दिली.

या परिसरातुन चोरी केलेल्या एकुण ११ मोटारसायकली एकुण किंमत ८,६५,०००रुपयाच्या या गुन्हयात जप्त करण्यात आलेल्या आहेत. गुन्हयाचा अधिक तपास प्रणय शिंदे हे करित आहेत.

ही कामगीरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक प्रतिम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी विभाग बार्शी, जालिंधर नलकुल यांच्या मार्गदर्शनाखाली माढा पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी प्रल्हाद जगताप, रामचंद्र हांडे, विष्णू खंडागळे, पी.एस. मांजरे, पी.बी. शिंदे, संदिप निचळ, सुनिलदत्त बनसोडे, एम.डी. शिंदे, एस. एस. घोळवे, व सायबर पोलीस ठाण्याकडील जाधव व चालक लक्ष्मण शेळके, सचिन काशिद, संकेत मस्के यांनी केली आहे.

get_footer();